बडोदा (वृत्तसंस्था) एकाच एटीएममध्ये गेलेल्या ३ जवानांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक घटना बडोद्यात घडली आहे.
गुजरातमधील बडोद्यामध्ये लष्कराच्या तीन जवांनाना करोनाची लागण झाली आहे. हे तीनही जवान बडोद्यातील एकाच एटीएममध्ये पैसे काढायला गेले होते. या जवानांची कोरोना चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर एकच खळबळ उडाली. या जवानांच्या संपर्कात आलेल्या २८ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. या जवानांवर उपचार सुरू करण्यात आले आहे.