गुवाहाटी (वृत्तसंस्था) आसाममध्ये आमदाराच्या वडिलांवर अत्यसंस्कार करण्यासाठी साधारण दहा हजार लोक उपस्थित राहिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर प्रशासनाने आजूबाजूची तीन गावे सील केली आहेत.
आसाममधील नागाव जिल्ह्यातील आमदाराचे वडील खैरुल इस्लाम यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. २ जुलै रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नागाव जिल्हा प्रशासनाच्या अंदाजानुसार, अंत्यविधीसाठी कमीत कमी दहा हजार जणांची उपस्थिती होती. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ जवळील तीन गाव सील केली आहेत. खैरुल इस्लाम यांचा मुलगा आणि धींग येथील आमदार अमीनुल इस्लाम यांनी वडिलांच्या अंत्यविधीचे काही फोटो फेसबुकवर पोस्ट केले आहेत. यामध्ये हजारोच्या संख्येनं लोक हजर असल्याचे दिसतेय. या प्रकरणी दोन तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. लोकांनी लोकांनी सोशल डिस्टसिंग आणि मास्कसारख्या नियमांचे उल्लंघन केले आहे.