धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तरूणाला अटक

चोपडा प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १४ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तरूणाला अटक करण्यात आली आहे.

 

पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील एका गावात १४ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ती आठवीचे शिक्षण घेत आहे. गुरूवार ६ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता अल्पवयीन मुलगी घरी एकटी असतांना गावातील संशयित आरोपी धीरज रविंद्र फुगारे (वय-१८) हा घरात आला. मला फोन का लावत नाही असे म्हणून पहिल्यांदा मुलीचा विनयभंग केला. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी पिडीत अल्पवयीन मुलीने हा प्रकार नातेवाईकांना सांगितला. त्यानंतर अडावद पोलीस ठाण्यात धाव घेतली. पीडीत मुलीच्या फिर्यादीवरून अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील करीत आहे.

Protected Content