अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गावातीलच एकाने तिच्या राहत्या घरात घुसून तिच्यावर अत्याचार केला. या अत्याचारातून अल्पवयीन मुलीने एका बाळाला जन्मदिल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत मारवड पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहितीशी की, अमळनेर तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २०२० ते जुलै २०२० पर्यंत गावातील समाधान गुलाब पारधी याने अल्पवयीन मुलीच्या घरात कोणीही नसताना तिच्यावर अत्याचार केले. हा अत्याचार त्याने वारंवार सुरूच ठेवला. या अत्याचारातून पीडित मुलगीही गर्भवती राहिली. त्यानंतर तिने कालांतराने बाळाला जन्म देखील दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार घडल्यानंतर पिडीतेसह तिच्या नातेवाईकांनी मारवड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी समाधान गुलाब पारधी यांच्या विरोधात मारवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे करीत आहे.