जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील दापोरे शिवारात अवैधरित्या दोन गावठी हातभट्टीवर तालुका पोलीसांनी आज बुधवारी ६ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता छापा टाकून सुमारे १३ हजार ७५० रूपये किंमतीचे रसायन नष्ट केले. या कारवाईत दोन जणांना ताब्यात घेतले असून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुका पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील दापोरे शिवारात अवैधरित्या देशी दारूच्या हातभट्ट्या सुरू असल्याची गोपनिय माहिती तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना मिळाली. त्यानुसार पथकातील पोलिस उपनिरीक्षक नयन पाटील, पो.हे.कॉ.हरीलाल पाटील, अनिल मोरे, चेतन पाटील, महेंद्र सोनवणे,तुषार जोशी यांनी आज दुपारी ४ वाजता कारवाई करत दापोरे शिवारात सुरू असलेली दारूभट्टी उद्ध्वस्त करून ८ हजार ७५० रूपये किंमतीचे कच्चे व पक्के रसायन नष्ट केले. तर तालुक्यातील शिवलवन येथेही कारवाई करत ५ हजार रूपये किंमतीची रसायन व दारू नष्ट केली. यात किशोर रमेश काळे (वय-४५) रा. दापोरे आणि जिभू वसंत गायकवाड (वय-३०) रा. दापोरे ता. जि.जळगाव यांना ताब्यात घेतले आहे. पो.ना. विश्वनाथ गायकवाड यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीसात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तालुका पोलीस कर्मचारी करीत आहे.