पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । घर खर्चासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणावे या मागणीसाठी तालुक्यातील लोहटार येथील माहेरवाशिणीचा पुणे जिल्ह्यातील सासरी शारीरिक व मानसिक छळ सुरू असलेल्या वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर विवाहितेने पतीसह सासऱ्याविरुद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, लोहटार ता. पाचोरा येथील माहेर असलेल्या रुपाली हिचा विवाह रासेगाव ता. खेड जि. पुणे येथील ओंकार अर्जुन केदारी याचेशी ४ मे २०२२ रोजी मोठ्या थाटात पार पडला होता. पती ओंकार केदारी यांना दारुचे व्यसन लागल्याने रुपाली व ओंकार यांच्यात किरकोळ कारणावरून भांडण होवु लागले. तसेच ओंकार हा रुपालीच्या चारित्र्यावर संशय देखील घेवु लागला. दरम्यान सासरे अर्जुन केदारी यांचेकडुन घर खर्चासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणावे अशी मागणी रुपाली हिच्याकडे वारंवार होवु लागली रुपाली हिच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने अखेर सततच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर रुपाली हिने आज १२ डिसेंबर रोजी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये पती ओंकार अर्जुन केदारी व सासरे अर्जुन बुधानी केदारी यांचे विरुध्द गुन्हा नोंदविला असुन या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सुर्यकांत नाईक हे करीत आहे.