अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । माहेरहून दुचाकी, फ्रीज व कुलर घेण्यासाठी दोन लाख रूपये आणावे या मागणीसाठी विवाहितेला मारहाण करून धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सोमवारी १७ एप्रिल रोजी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, अमळनेर शहरातील माहेर असलेल्या सिमा योगेश दिघे (वय-३५) यांचा विवाह धुळे येथील योगेश शांताराम दिघे यांच्याशी सन २०१७ मध्ये विवाह झाला. लग्नाचे सुरूवातीचे सहा महिने सासरच्या मंडळींनी विवाहितेला चांगली वागणूक दिली. त्यानंतर विवाहितेला महेरहून फ्रीज, कुलर आणि दुचाकी घेण्यासाठी २ लाखांची मागणी केली. पैसे आणले नाही म्हणून पती योगेश दिघे याच्यासह सासू, सासरे, जेठ, जेठाणी यांनी त्रास देण्यास सुरूवात केली. दरम्यान, माहेरचे आणि सासरकडील काही मंडळींनी समजून सांगितले. त्यानंतर पुन्हा पतीने पैशांची मागणी केली. या त्रासाला कंटाळून विवाहिता अमळनेर येथे माहेरी निघून आल्या. सोमवारी १७ एप्रिल रोजी विवाहितेने अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती योगेश शांताराम दिघे, सासरे शांताराम वक्रा दिघे, सासू हंसाबाई शांताराम दिघे, जेठ नितेश शांताराम दिघे, जेठाणी निलीमा नितेश दिघे सर्व रा. धुळे यांच्या विरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार बापू साळुंखे करीत आहे.