विद्यूत तारांच्या शार्टसर्कीटमुळे शेतातील मकाला आग

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील हिंगाणे खुर्द शिवारात विद्युतदारांच्या शॉर्टसर्किटमुळे शेतातील मका जळून खाक झाला आहे, यामध्ये शेतकऱ्याचे २५ हजाराचे नुकसान झाले असून धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.

धरणगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ज्ञानेश्वर नारायण पाटील (वय-७३) रा. हिंगोली खुर्द ता. धरणगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून शेती करून आपला शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे हिंगोने खुर्द शिवारात शेत गट नंबर १८६ मध्ये शेत आहे. या शेतात त्यांनी मक्याची लागवड केली आहे. दरम्यान रविवारी १६ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता शेतातून गेलेल्या महावितरण कंपनीच्या विद्युततारांच्या झालेल्या शॉर्टसर्किटमुळे शेतातील मका जळून खाक झाला आहे. यामध्ये शेतकऱ्याचे जवळपास २५ हजार रुपये किमतीचे नुकसान झाले आहेत. या संदर्भात ज्ञानेश्वर पाटील यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन खबर दिली. त्यांनी दिलेल्या खबरीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक दीपक पाटील करीत आहे.

Protected Content