जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील वडनगरी येथे महिलांना गटारीजवळ बसवून त्यांना जाणून बुजून उष्टे अन्न खायला दिले, याचा जाब विचारला असता, संबंधितांनी जातीवाचक शिवीगाळ करुन महिलेसह तिच्या मुलांन मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटनेप्रकरणी तब्बल तीन महिन्यानंतर सोमवार, २३ जानेवारी रोजी पाच जणांविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असे की, वडनगरी येथे मंगला गायकवाड या वास्तव्यास आहे. १ ऑक्टोंबर २०२२ रोजी गावात दुर्गोत्सवानिमित्ताने भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी मंगला गायकवाड व अनिता पवार हे याठिकाणी गेले, त्यांना गटारीजवळ बसवून संबंधितांनी जाणून बुजून उष्टे अन्न खायला, याचा जाब विचारला असता, यावेळी भुवन प्रभाकर पाटील व नंदलाल गोकुळ पाटील यांनी जातीवाचक शिवीगाळ करत गावात राहू देणार नाही, घर पेटवून टाकू अशी धमकी दिली. यादरम्यान मृणाल भूवन पाटील, जयेश चंपालाल पाटील यांनी लाकडी दांडक्याने मंगला गायकवाड व अनिल पवार यांना मारहाण केली, तर नंदलाल गोकूळ पाटील, भिका रामसिंग पाटील यांनी मंगला गायकवाड यांचा मुलगा दिपक व शंकर या दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी तब्बल तीन महिन्यानंतर सोमवार, २३ जानेवारी रोजी, मंगला गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भुवन प्रभाकर पाटील, नंदलाल गोकूळ पाटील, भिका रामसिंग पाटील, जयेश चंपालाल पाटील, मृणाल भुवन पाटील, सर्व रा. वडनगरी यांच्याविरोधात ॲट्रासिटीसह दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आहे. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत हे करीत आहेत.