दोन दुचाकी धडकल्या; एक ठार, एक गंभीर जखमी

जामनेर प्रतिनिधी । शहरापासुन जवळच असलेल्या गजानन ढाब्या समोर दोन दुचाकींच्या समोरा समोरील धडकेत एक जण जागीच ठार झाला तर दुसरा एक जण गंभीररीत्या जखमी झाला आहे.

अपघाताची घटना जामनेर-बोदवड रस्त्यावर आज रात्री पावणेआठच्या दरम्यान घडली. त्यामधे गजानन विश्राम चौधरी (वय ३५ रा. इंदीरा आवास जामनेर) हा जागीच ठार झाला तर शेख बिलाल शेख मुसा मनीयार (वय २२)हा डोक्याला,हाता-पायाला जबर मार लागल्याने जखमी झाला असून त्याला लागलीच पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे. गंभीर जखमी झालेला शेख बिलाल हा मुक्ताईनगरचा रहीवाशी असुन नातेवाईकांकडे लग्नासाठी जामनेरला आला होता.

Protected Content