Home क्राईम दोन दुचाकीची समोरासमोर धडक ; दोघे जखमी 

दोन दुचाकीची समोरासमोर धडक ; दोघे जखमी 

0
51


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील मन्यारखेडा फाट्याजवळ दोन समोरासमोर झालेल्या दुचाकीच्या धडकेत दोन जण जखमी झाल्याची घटना घडली. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जाकीर निजाम खाटीक (वय-४५) रा.पोलीस कॉलनी सुप्रीम कॉलनीजवळ जळगाव हे आपल्या कुटुंबीयांचा वास्तव्याला आहे. ५ सप्टेंबर रोजी दुपारी ४.३० वाजता जाकीर खाटीक हे त्यांचा पुतण्या अल्ताफ निजाम खाटीक यांच्यासोबत दुचाकी (एमएच १९ एयू ६५००) ने सुप्रीम कॉलनी येथे जात असताना समोरून येणाऱ्या (एमएच १९ डीवाय ९५२९) क्रमांकाच्या दुचाकीने भारधाव वेगाने येऊन जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील अल्ताफ निजाम खाटीक आणि अफसर अल्ताफ खाटीक हे दोघे जखमी झाले. दोघांना तातडीने शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारात दाखल करण्यात आले.

दरम्यान अपघातानंतर चार दिवसांनी ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता (एमएच १९ डीवाय ९५२९) वरील अज्ञात चालकावर नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक नूर खान पठाण करीत आहे.


Protected Content

Play sound