जोशी पेठ येथे दोन जणांना बेदम मारहाण

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शहरातील जोशी पेठ येथे दोन जणांना बेदम मारहाण करून दुखापत केल्याची घटना घडली आहे. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अखिल शहा रहीम शहा (वय-४३) रा.जोशी पेठ जळगाव हे आपल्या दोन मुलांचं वास्तव्याला आहे. शुक्रवार ९ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास काहीही कारण नसताना मोबीन शहा सलीम शहा आणि रईस शहा नसीर शहा यांना त्यांच्या गल्लीत राहणारे वसीम बागवान आणि शहादुल्ला बागवान (पूर्ण नाव माहित नाही) रा. जोशी पेठ यांनी शिवीगाळ व करून मारहाण करण्यास सुरुवात केली. याचा जाब अखिल शहा रहीम शहा यांनी केला असता त्यांनादेखील शिवीगाळ केली. त्यानंतर त्यानंतर दगडफेक केली.

या संदर्भात शनीपेठ पोलीस ठाण्यात संशयित आरोपी वसीम बागवान आणि शहादुल्ला बागवान यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार संजय मराठी करीत आहे.

Protected Content