जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एल.एच.शाळेच्या बाजूला रोडवर उभ्या डंपरमधून ३८ हजार रूपये किमती ४०० लीटर डिझेल चोरी करतांना दोन जणांना रंगेहात पकडले असून दोघांना एमआयडीसी पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. याप्रकरणी गुरूवारी २ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता दोघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील आदर्श नगरात राहणारे मयुर रविंद्र चौधरी (वय-२९) यांचे मालकीचे डंपर क्रमांक (एमएच १९ झेड ४७२३ आणि एमएच १९ झेड ८०२४) हे दोन डंपर शहरातील एल.एच.शाळेच्या जवळ पार्किंगला लावलेले आहे. गुरूवार २ मार्च रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास प्रविण हंसराज राठोड आणि ज्ञानेश्वर उखा राठोड दोन्ही रा. रामदेववाडी ता.जि.जळगाव हे दोघेजण डंपरमधून डिझेलची चोरी करतांना रंगेहात पकडले आहे. त्यांची अधिक चौकशी केली असता दोघांनी गेल्या दोन महिन्यांपासून वेळोवेळी उभ्या असलेल्या डंपरमधून सुमारे ३८ हजार रूपये किंमतीचे ४०० लिटर डिझेल वेळोवेळी चोरून नेल्याची माहिती समोर आली आहे. दोघांना पकडून एमआयडीसी पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. याप्रकरणी गुरूवार २ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता मयुर रविंद्र चौधरी रा. आदर्श नगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी प्रविण हंसराज राठोड आणि ज्ञानेश्वर उखा राठोड दोन्ही रा. रामदेववाडी ता.जि.जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नितीन पाटील हे करीत आहे.