पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील बांबरूड (राणीचे) येथील भाऊबंदकीच्या शेतातील पाण्याचे कुंड भरण्याच्या कारणावरुन झालेल्या वादाच्या प्रकरणी दि. १८ जानेवारी रोजी पाचोरा न्यायालनाने या गुन्ह्यातील दोन आरोपींना दोन गुन्ह्यात पाच वर्षांची शिक्षा व प्रत्येकी २० हजार प्रमाणे ४० हजार रूपयांचा दंड थोटावला आहे.
सन २०१८ मध्ये शेतातील पाण्याचे कुंड भरून देण्याच्या कारणावरून झालेल्या वादात श्रीराम भदाणे यांनी पाचोरा पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादिप्रमाणे गु.र.न. ९६ / २०१८ भा. द. वी. कलम ३२६, ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला होता. याप्रकरणी आज पाचोरा न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला असुन यातील आरोपी दिपक भदाणे व वाल्मीक भदाणे दोन्ही रा. बांबरुड (राणीचे) यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जी. बी. औंधकर यांनी सदर गुन्ह्यात दोषी ठरविले असुन भा.द.वी. कलम ३२६ मध्ये ३ वर्ष सश्रम कारावास, ३२४ मध्ये २ वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी २० हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास ३ महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.
सदर गुन्ह्याचा तपास पोलिस अधिक्षक, जळगाव, अप्पर पोलीस अधिक्षक, चाळीसगांव तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी पाचोरा भाग पाचोरा, प्रभारी अधिकारी पाचोरा पोलिस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार हिरामण चौधरी यांनी केला असुन सरकारी अभियोक्ता रमेश माने यांनी सरकार पक्षातर्फे युक्तिवाद. तर आरोपी पक्षा तर्फे अॅड. एस. पी. पाटील यांनी कामकाज पाहीले आहे. तसेच पैरवी अधिकारी म्हणुन पोलिस हेड कॉन्स्टेबल दिपक पाटील व कोर्ट केसवाच म्हणुन पोलिस नाईक विकास सुर्यवंशी यांनी कामकाज पाहिले.