यावल- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दुहेरी संकटकाळात देखील तालुक्यातील शिरसाड शेतकरी निर्मल राजेंद्र पाटील यांनी आपल्या शिवारातील पारंपारिक केळी पिकाला पर्याय म्हणून 2 एकर क्षेत्रात जून महिन्यात सेलम जातीचे हळदी वानाची लागवड केली आणि उत्तम व्यवस्थापनातून प्रतिकूल परस्थितीतही 410 क्विंटल इतके विक्रमी उत्पादन घेतले आहे.
कोरोना विषाणू संसर्ग प्रार्दूभावाच्या गोंधळात सापडेला कष्टकरी बळीराजा कधी निसर्गाच्या लहरी बेमोसमी पाऊसचा अस्मानी फटक्याने तर कधी वाढत्या खतांच्या किमतीमुळे दुहेरी संकटात आलेला असतांना या संकटकाळात देखील तालुक्यातील शिरसाड शेतकरी निर्मल राजेंद्र पाटील यांनी केळी पिकाला पर्याय म्हणुन आपल्या शिरसाड शिवारातील पारंपारिक केळी पिकाला पर्याय म्हणून 2 एकर क्षेत्रात जून महिन्यात सेलम जातीचे हळदीचे वान लागवड केली होती. यात बळीराजा सीड्स यांच्या मार्गदर्शनाखाली तिचे व्यवस्थापन केले. उत्तम व्यवस्थापनामुळे प्रतिकूल परस्थितीतही त्यांनी 2 एकर क्षेत्रात 410 क्विंटल इतके विक्रमी उत्पादन घेतले आहे.
विशेष म्हणजे सदरील सेलम जातीच्या हळदित सर्वाधिक जास्त औषधी गुणधर्म आढळून आल्यामुळे औषधी कंपन्यांकडून मागणी होत आहे. चांगले उत्पादन येत असल्यामुळे सदरील हळदीला शेतकरी वर्गाकडून बियाणे म्हणून देखील मागणी वाढत आहे. जिल्ह्यात येणाऱ्या काळात केळी पिकाला उत्तम पर्याय म्हणून हळद पिकाचे भविष्य उज्ज्वल वाटत आहे. परिश्रम जिद्द व चिकाटीने ध्येय गाठणारे शेतकरी नाव निर्मल राजेंद्र पाटील यांचा आदर्श समोर ठेवून अल्पभूधारक शेतकऱ्यांनी केळीला पर्यायी म्हणून हदळी पिकाकडेही वळता येईल असे आपल्या अनुभवातून निर्मल पाटील यांनी दाखविले आहे.