यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील भालोद येथील पाणी पुरवठा योजनेचे भूमिपुजन दोन्ही मंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आहे.
स्थानिक व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या अथक प्रयत्नातुन भालोदकरांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणारे जलकुंभाचे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित भुमिपुजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भालोद गावाला पिण्याचे पाणी पुरवठा करणारे जलकुभ हे खूप जीर्ण झाले असून, या जलकुंभाचे बांधकाम ही पडत आहेत.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हर घर जल या महत्वकांशी योजेनेच्या माध्यमातुन अधिक वेगाने ही योजना राबविण्यासाठी व भविष्यातील गरज लक्षात घेता ग्रामपंचायत भालोद ह्यांनी सदर जलकुंभाची समस्या कृषिमित्र स्व. हरीभाऊ जावळे ह्यांचे चिरंजीव व युवानेते अमोल हरीभाऊ जावळे ह्यांच्या लक्षात आणून दिली. अमोल हरीभाऊ जावळे ह्यांनी सदर विषयाचा सातत्याने पाठपुरावा करून जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे पाणीपुरवठामंत्री मा.ना. गुलाबराव पाटील व राज्याचे क्रीडामंत्री गिरीश महाजन ह्यांचे पाठपुरावा करत ३.५९ कोटी रुपयांची योजना मंजूर करून घेतली.
ह्या नवीन जलकुंभाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम येत्या ९ एप्रिल रोजी ना. गिरीषभाऊ महाजन ( क्रीडा व ग्रामविकास मंत्री, महाराष्ट्र राज्य) ह्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील ( पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, महाराष्ट्र राज्य) ह्याच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे (आमदार, जळगाव), श्रीमती रक्षाताई खडसे (खासदार) , संजय सावकारे (आमदार भुसावळ ), शिरीष चौधरी (आमदार रावेर ) ह्यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
कार्यक्रमाचे निमंत्रक सरपंच, उपसरपंच,ग्राम विकास अधिकारी भालोद ग्रामपंचायत ह्यांनी सर्व ग्रामस्थांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन केले आहे. कृषीमित्र स्व. श्री हरीभाऊ माधव जावळे ह्यांच्या अवकाळी निधनानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात विकासकामांचे भूमिपूजन होत असल्याने भाजपा शहर अध्यक्ष श्री मिनल जावळे ह्यांनी तालुक्यातील सर्व भाजपा सेना युतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे असे विनम्र आवाहन केले आहे.