Home महिला दोन्ही गटात धुम्मस : महिला शिवसैनिकांनी शिंदे समर्थकांना दिला चोप !

दोन्ही गटात धुम्मस : महिला शिवसैनिकांनी शिंदे समर्थकांना दिला चोप !

0
37

 

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | दसरा मेळाव्याची उत्सुकता शिगेला पोहचली असतांनाच शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचे दिसून आले. यात महिला शिवसैनिकांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना चोपले.

नाशिक-मुंबई दरम्यान शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये तुफान राडा झाला आहे. नाशिक मुंबई महामार्गावर महिला शिवसैनिक बसमधून जात असताना त्याच सुमारास शिंदे गटाचे काही कार्यकर्ते खाजगी वाहनाने जात होते. यावेळी कसारा घाटाच्या पुढे शहापूरच्या जवळ महिला शिवसैनिक बसमधून जात असताना बाजूने जाणार्‍या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी महिलांना अश्लील हावभाव करत डिवचल्याचा आरोप महिलांनी केला आहे. त्यामुळे महिला कार्यकर्त्यांनी गाडी थांबवून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना भर रस्त्यात चोप दिला आहे.

यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. काही वेळातच काही शिवसैनिकांनी महिलांना थांबवत वाद मिटवण्यास सांगितले. यामुळे वाद मिटला. तथापि, काही क्षणातच सोशल मीडियातून याची माहिती सर्वत्र पसरून याची चर्चा सुरू झाली आहे.


Protected Content

Play sound