Home धर्म-समाज ‘दैनिक पुण्यनगरी’चे संस्थापक-संपादक बाबा शिंगोटे यांचे निधन

‘दैनिक पुण्यनगरी’चे संस्थापक-संपादक बाबा शिंगोटे यांचे निधन


पिंपरी चिंचवड (वृत्तसंस्था) ‘दैनिक पुण्यनगरी’चे संस्थापक-संपादक मुरलीधर अनंता उर्फ बाबा शिंगोटे यांचे आज दुपारी निधन झाले. जुन्नर तालुक्यातील जन्मगाव असलेल्या गायमुख वाडीत त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

 

बाबांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील उंब्रज या गावी ७ मार्च १९३८ रोजी झाला होता. इयत्ता चौथीपर्यंत शिकलेल्या बाबांनी शिक्षण अर्धवट सोडल्यानंतर नोकरी-व्यवसायासाठी मुंबई गाठली. सुरुवातीला फळ विक्री, त्यानंतर बुवाशेठ दांगट यांच्याकडे वृत्तपत्र टाकण्याचे काम सुरु केले. ‘मुंबई चौफेर’ नावाचे सायं दैनिक बाबा शिंगोटे यांनी १९९४ मध्ये सुरु केले. यानंतर दैनिक आपला वार्ताहर, दैनिक यशोभूमी, दैनिक कर्नाटक मल्ला, तामिळ टाईम्स, हिंदमाता ही दैनिके सुरु केली. यातील दैनिक पुण्यनगरी हे १९९९ साली सुरु झाले.


Protected Content

Play sound