नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात आज (शनिवार) २४ तासांत ४००० नवे रुग्ण आढळून आले. आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ९०६४८ वर पोहोचली. तर देशात करोना विषाणूमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या शनिवारी २७५२ झाल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्रातील विचार केला तर नवी मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. नवी मुंबईत आतापर्यंत ११२८ कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर ३६७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर कोरोनाचे आतापर्यंत २६ मृत्यू झाले आहेत. लॉकडाऊन वाढवताना राज्याचे आर्थिक चक्र सुरु राहण्याची काळजी राज्य सरकार घेणार आहे. यापूर्वी राज्यात काही अटी आणि नियमांसह उद्योगधंदे सुरु करण्यात आले आहेत. आणखी काही उद्योगधंदे सुरु करण्याबाबत सरकार आराखडा आखण्याची शक्यता आहे.