देशात दिवसभरात ३ लाख ४९ हजार ६९१ नवे बाधित

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । रविवारच्या आकडेवारीनुसार २४ तासांत ३ लाख ४९ हजार ६९१ नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे. त्याचवेळी देशात बरे झालेल्या रुग्णांची संख्या देखील वाढली असून आजघडीला देशात कोरोनाचे एकूण २६ लाख ८१ हजार ७५१ अॅक्टिव रुग्ण आहेत.

 

 

एकीकडे देशात १ मे पासून व्यापक स्तरावर लसीकरण केलं जाणार असताना दुसरीकडे देशातील कोरोना दिवसेंदिवस अधिकाधिक भीषण होऊ लागला आहे. रविवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार देशभरात २४ तासांत तब्बल २७६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे   आत्तापर्यंत भारतात झालेल्या मृतांची संख्या १ लाख ९२ हजार ३११ इतकी झाली आहे. त्यासोबतच २४ तासांमध्ये सलग चौथ्या दिवशी भारतात ३ लाखांहून जास्त  बाधित सापडले आहेत.

 

 

 

देशात आजपर्यंत एकूण १ कोटी ६९ लाख ६० हजार १७२  बाधित सापडले आहेत.  त्यापैकी १ कोटी ४० लाख ८५ हजार ११० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे रिकव्हरी रेटच्या बाबतीत काहीसा दिलासा असला, तरी गेल्या दोन महिन्यांमध्ये देशातील  रुग्णसंख्या आणि मृतांचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढू लागला आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी संचारबंदी, जमावबंदी,  निर्बंध किंवा लॉकडाऊन असे पर्याय स्वीकारून  नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे.

Protected Content