देशात आतापर्यंतची सर्वाधिक कोरोना रुग्णवाढ

 

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । . गेल्या २४ तासांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. गुरूवारी १.३१ लाख नवीन रुग्णांची भर पडली.जवळपास ८०० जणांचा मृत्यू झाला. देशात करोनाचा शिरकाव झाल्यापासून आतापर्यंतचा हा सर्वात मोठा आकडा आहे.

 

 

 

देशातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांचा एकूण आकडा आता तब्बल १० लाखांजवळ पोहोचला आहे. सध्या हा आकडा ९.७४ लाख झाला असून रुग्णवाढीचा वेग असाच सुरू राहिल्यास लवकरच १० लाखांचा आकडा पार होण्याची शक्यता आहे. देशात सर्वाधिक कहर हा महाराष्ट्रात असून गेल्या १० दिवसांपासून दररोज ५० हजारांपेक्षा जास्त जणांना लागण होत आहे. एकट्या मुंबईतून नऊ हजार नवीन रुग्णांची भर पडली. दिल्लीतही गुरूवारी जवळपास ७,५०० रुग्णांची भर पडली.उत्तर प्रदेशमध्येही कहर सुरू आहे. उत्तर प्रदेशमध्ये काल ८ हजारपेक्षा जास्त रुग्ण वाढले.

 

दरम्यान, करोनाचा फैलाव ‘युद्धपातळीवर’ रोखण्यासाठी पुढील दोन-तीन आठवडे ठामपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केले आहे. ११ ते १४ एप्रिल दरम्यान ‘लस महोत्सव’ आयोजित करण्याचे आवाहनही त्यांनी केले. ‘युद्धपातळीवर काम करण्याची आवश्यकता आहे’, असे पंतप्रधानांनी सांगितले.

Protected Content