नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातील सर्व मुस्लिमांना १९४७ मध्येच पाकिस्तानला पाठवून द्यायला हवे होते, असे वादग्रस्त वक्तव्य पुन्हा एकदा केंद्रीयमंत्री गिरीराज सिंह यांनी केले आहे. पुर्णिया येथे गुरुवारी माध्यमांशी ते बोलत होते.
जेएनयू विद्यार्थी परिषदेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार दौऱ्यावर असलेल्या जिल्ह्यांमध्ये गिरीराज सिंह सध्या दौरा करत आहेत. पत्रकारांशी बोलतांना गिरीराज सिंह म्हटले की, अलिगढ मुस्लीम विद्यापीठाचा विद्यार्थी म्हणतो जो आमच्या धर्माशी पंगा घेईल तो नष्ट होईल. हैदराबादमध्ये तर सीएए मागे न घेतल्यास आम्ही शांत बसणार नाही, भारताचे तुकडे-तुकडे करू असे म्हणतात. त्यामुळे देशातील नागरिकांना देशासाठी समर्पण करण्याची वेळ आली आहे. यावेळी त्यांनी भारत स्वातंत्र्याची आणि फाळणीची आठवण करत, १९४७ मध्येच सर्व मुस्लिमांना पाकिस्तानात पाठवून द्यायला हवे होते, असे म्हटले. त्यावेळी आपले पूर्वज स्वतंत्र्यासाठी लढा देत होते. तर जीना इस्लामिक स्टेट बनविण्यासाठी प्रयत्न करत होते, असेही त्यांनी नमूद केले.