नवी दिल्ली वृत्तसंस्था । भाजपने अच्छे दिनचे स्वप्न दाखविल्यानंतर आता काँग्रेसने देशातील प्रत्येक नागरिकाला किमान उत्पन्न देण्याचे नवीन स्वप्न दाखवत निवडणूक जिंकण्याची तयारी केली आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी छत्तीसगडमधील एका सभेत देशातील प्रत्येक नागरिकाला किमान उत्पन्नाची हमी देण्याची घोषणा केली आहे. ते म्हणाले की, आम्ही विरोधी पक्षात असताना जेव्हा जेव्हा शेतकरी कर्जमाफीची मागणी करायचो, तेव्हा सरकारचं एकच उत्तर असायचं – आमच्याकडे पैसे नाहीत. देशाच्या चौकीदाराकडे छत्तीसगडच्या शेतकर्यांसाठी ६ हजार कोटी रुपये नाहीत, पण अंबानीला द्यायला ३० हजार कोटी रुपये आहेत. मेहुल चोक्सी पैसे घेऊन पसार होऊ शकतो, पण शेतकर्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत, असंही त्यांनी सुनावलं. याउलट, काँग्रेसने सरकार स्थापन झाल्यानंतर लगेचच शेतकर्यांचं कर्ज माफ केल्याचं त्यांनी नमूद केले. यासोबत देशात काँग्रेसची सत्ता आल्यास प्रत्येक नागरिकाला किमान उत्पन्नाची हमी देणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
कांग्रेस पार्टी ने एक ऐतिहासिक निर्णय लिया है कि 2019 चुनाव जीतने के एकदम बाद कांग्रेस पार्टी गारंटी करके न्यूनतम आमदनी देने जा रही है : कांग्रेस अध्यक्ष @RahulGandhi #CongressForMinimumIncomeGuarantee pic.twitter.com/jTttgR2wFB
— Congress (@INCIndia) January 28, 2019