जळगाव | रोजगार वाढवण्यासाठी शेतकरी, महिला व युवा सक्षमीकरणाच्या दृष्टीने केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये केलेल्या तरतुदी निश्चितपणे देशाला आर्थिक महासत्तेच्या दिशेने घेऊन जातील असा विश्वास खासदार रक्षाताई खडसे यांनी व्यक्त केला.
रक्षाताई खडसे म्हणाल्या की. वैयक्तिक करदात्यांसाठी करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढवून वाढल्यामुळे मध्यमवर्गीय करदात्यांना त्याचा फायदा मिळेल. देशाच्या आर्थिक विकासाचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी हे सरकार प्रामाणिक प्रयत्न करत आहे.
प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळे जोडण्यासाठी नवीन तेजस ट्रेन, ज्यामुळे अजिंठा लेणी ला जोडण्यासाठी भुसावळ रेल्वे विभागाचा फायदा होईल.
किसान उडाण योजनेमुळे कृषी माल जो लवकर खराब होत आहे त्यासाठी देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होईल, कालच जळगाव विमानतळावर नाईट लँडिंगची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे किसान उडाण योजनेचा जळगाव जिल्ह्याला सर्वात जास्त फायदा होईल.
जळगाव जिल्ह्यातील कृषी माल रेल्वे वाहतुकीने पोहोचवण्यासाठी रेल्वे वाहतूक सुरू व्हावी अशी खासदार रक्षाताई खडसे यांनी सुरुवातीपासूनच मागणी केली होती. किसान रेलचा फायदा जळगाव जिल्ह्याला मोठा फायदा मिळेल असा विश्वास खासदार रक्षाताई खडसे यांनी व्यक्त केला.