Home आरोग्य देशभरात २४ तासांत आढळले करोनाचे १२ हजार ८८१ नवे रुग्ण

देशभरात २४ तासांत आढळले करोनाचे १२ हजार ८८१ नवे रुग्ण


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मागील चोवीस तासांमध्ये देशभरात कोरोनाचे सर्वाधिक तब्बल १२ हजार ८८१ रुग्ण वाढले असून, ३३४ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. याचबरोबर देशातील करोना रुग्णांची संख्या ३ लाख ६६ हजार ९४६ वर पोहचली आहे.

 

 

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून मिळालेल्या माहिती नुसार भारतात १२ हजार २३७ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. असे असले तरी दुसरीकडे निरोगी होणाऱ्या रुग्णांची संख्याही काही कमी नाही आहे. भारतात आतापर्यंत १ लाख ९४ हजार ३२४ रुग्ण निरोगीही झाले आहेत. देशात सध्या १ लाख ६० हजार ३८४ सक्रीय रुग्ण आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात बुधवारी ३३०७ रुग्णांनी नोंद झाली. तर, ११४ लोकांचा मृत्यू झाला. तर राज्यातील एकूण संक्रमितांचा आकडा १ लाख १६ हजार ७५२ झाला आहे.


Protected Content

Play sound