नवी दिल्ली वृत्तसंस्था । देशात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून अजूनही रुग्णवाढीत घट होण्याची लक्षणे दिसत नाहीत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशभरात बाधितांची संख्या ६२ लाखांच्या पुढे सरकली आहे. बुधवारी ८० हजार ४७२ नवे रुग्ण वाढले आहेत. या बरोबरच देशातील एकूण बाधितांची संख्या ६२ लाख २५ हजार ७६३ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांमध्ये १,१७९ रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत एकूण मृतांची संख्या ९७ हजार ४९७ वर पोहोचली आहे. २४ तासांमध्ये ८६ हजार ४२८ रुग्ण बरे झाले आहेत. पुन्हा एकदा २४ तासांमध्ये नव्या रुग्णांच्या संख्येहून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे.
देशात सध्याच्या घडीला ९ लाख ४० हजार ४४१ सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोनावर मात करणाऱ्या एकूण रुग्णांची संख्या ५२ लाखांच्या आसपास पोहोचली आहे. ५१ लाख ८७ हजार ८२५ रुग्ण बरे झाले आहेत. सप्टेंबर महिन्यात २६ लाख ४ हजार ५१८ नवे रुग्ण आढळले. महिन्याभरात ३३ हजार २८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
२४ तासांमध्ये देशभरात १० लाख ८६ हजार ६८८ लोकांच्या चाचण्या घेण्यात आल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने दिली आहे. आतापर्यंत ७ कोटी ४१ लाख, ९६ हजार ७२९ लोकांचे नमुने घेण्यात आले आहेत.
देशात रुग्ण बरे होण्याचा दर ८३.३२ टक्के इतका आहे. मृत्युदर देखील १.५६ टक्क्यांवर आहे. पॉझिटीव्हीटीचा दर ७.४ टक्के इतका असून १५.१ टक्के अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.