यावल : प्रतिनिधी | तालुक्यातील कोरपावली येथील रहिवाशी देवेंद्र फेगडे (ह.मु. चिनावल ता.रावेर) यांची जळगाव जिल्हा काँग्रेस सेवा फाऊंनडेशनच्या जिल्हा महासचिव पदी निवड करण्यात आली आहे
ही निवड प्रदेशाध्यक्ष अॅड . सुभाषचंद्र गोडसे यांच्या आदेशाने जळगाव जिल्हाध्यक्ष जलील पटेल यांनी केली आहे निवडीबाबत त्यांचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड . संदीप पाटील, आमदार शिरीष चौधरी, मा. आमदार रमेश चौधरी, जिल्हा परिषदचे गटनेते प्रभाकर सोनवणे, रावेरचे कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, लीलाधर चौधरी, बारसु नेहेते, सुदाम पाटील, प्रमोद महाजन, प्रभाकर महाजन , केतन किरंगे, नगरसेवक देवेंद्र बेंडाळे, कलीम मण्यार, नितीन चौधरी, महिला काँग्रेसच्या यावल तालुकाध्यक्ष मनीषा पाचपोळे, यावल पंचायत समितीचे गटनेता शेखर पाटील, रावेरचे नगराध्यक्ष दारासेठ मोहम्मद, रावेर शहराध्यक्ष डॉ. शब्बीरखान, यावल शहराध्यक्ष कदिरखान, हाजी शब्बीरखान, युनूस पिंजारी, चिनावलचे चंदूभाऊ भंगाळे, इरफान सेठ, यावल सेवा फाऊनडेशनचे तालुकाध्यक्ष अभय महाजन, विक्की पाटील, नईमभाई, भुपेश जाधव, हर्षल दाणी, चंद्रकला इंगळे, मीनाक्षी जावरे, सद्दामशाह, अनिल जंजाळे, हाजी गफ्फारशाह, राहुल तायडे, तौफिकभाई, रामराव मोरे, विनोद पाटील, आदींनी तसेच जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते आदींनी अभिनंदन केले आहे