दूध संघाचा वाद पोहचला पोलीस ठाण्यात; मंदाताई खडसे यांच्याविरोधात तक्रार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा दूध संघात गिरीश महाजन समर्थक प्रशासक मंडळ आणि एकनाथ खडसे यांचे संचालक मंडळ मंगळवारी २ ऑगस्ट रोजी दुपारी आमनेसामने आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पहायला मिळाले. दरम्यान दिवसभराचा दोघांमधील हा वाद आता पोलीस ठाण्यापर्यंत पोहचला आहे. मंदाताई खडसे यांच्यासह त्यांच्या संचालक मंडळाविरोधात प्रशासक मंडळाने जळगाव शहर पोलिसात तक्रार दिली असून कारवाईची मागणी केली आहे.

 

संचालक मंडळाविरोधात कारवाईची मागणी तक्रारीत केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  संचालक मंडळ बरखास्त असतांनाही मंदाताई खडसे यांच्यासह त्यांच्या संचालक मंडळातील ११ संचालकांनी अनधिकृतरित्या जिल्हा दूध संघाच्या आवारात बेकायदेशीररित्या प्रवेश करुन दूधसंघाच्या मिटींग हॉलमध्ये बैठक घेतल्याचे अरविंद देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद आहे. यापुढे संचालक मंडळाने बेकायदेशीररित्या प्रवेश केल्यास कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होवून गुन्हा घडल्याची शक्यता अरविंद देशमुख यांनी तक्रारीव्दारे व्यक्त केली असून संबंधितांवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी असेही तक्रारीत म्हटले आहे.

Protected Content