दुसरा डोस कोरोना लस घेतल्यावर चक्कर येऊन आरोग्यसेवकाचा मृत्यू

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । भिवंडीत मंगळवारी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर काही वेळाने चक्कर येऊन आरोग्य सेवकाचा मृत्यू झाला मात्र, त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नसून शवविच्छेदन अहवालानंतरच हे कारण स्पष्ट होऊ शकणार आहे..

 

या घटनेत मृत्यू पावलेली ४० वर्षीय व्यक्ती ठाण्यातील मनोरमानगर परिसरामध्ये राहात होती. भिवंडीतील एका खासगी डॉक्टरकडे वाहनचालक म्हणून ते काम करीत होते. त्यांनी मंगळवारी सकाळी  भिवंडी शहरातील भाग्यनगरमधील केंद्रात   लसीचा दुसरा डोस घेतला होता. त्यानंतर ते लसीकरण केंद्रातील प्रतीक्षागृहात थांबले होते. पंधरा मिनिटांनी चक्कर येऊन ते खाली पडले.

 

त्यांना उपचारांसाठी भिवंडीतील स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या वृत्तास भिवंडी महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के आर. खरात यांनी दुजोरा दिला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. त्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल. दरम्यान कुटुंबीयांनी मृत्यूची पूर्ण चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.

Protected Content