जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दुधाचा व्यवसाय करणाऱ्याची १५ हजार रूपये किंमतीची मोटारसायकल दुकानासमोरून चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपक बाबुलाल इंवर (वय-५२) रा. भवानी पेठ, जळगाव हे आपल्या कुटुंबियांसोबत राहतात. झंवर यांचे जिल्हापेठ हद्दीत त्यांची डेअरीचे दुकान आहे. त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. या कामासाठी त्यांच्याकडे (एमएच-१९ डीजे ४३१६) क्रमांकाची मोटारसायकल आहे. नेहमीप्रमाणे २९ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजेच्या त्यांनी मोटारसायकल त्यांच्या दुकानासमोर असलेल्या भुषण ॲग्रो दुकानाजवळ पार्किंगला लावली होती. अज्ञात चोरट्याने १५ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याचे उघडकीला आले. त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला. परंतू दुचाकी कुठेही आढळून आली नाही.
अखेर मंगळवारी ३० ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक युनूस तडवी करीत आहे.