जळगाव प्रतिनिधी । शहरातील विश्वप्रभा हॉस्पिटलसमोरून एकाची दुचाकी चोरून नेणाऱ्या भामट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून त्यांच्या ताब्यातील दुचाकी हस्तगत केली आहे. पुढील कारवाईसाठी रामानंद नगर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील वराड येथील रहिवाशी सचिन रमेश पाटील (वय-३५) यांचा मुलगा आजारी असल्याने २० जुलै २०२० रोजी त्याला जळगावातील विश्वप्रभा हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल केले होते. पत्नीचा जेवनाचा डबा घेवून २३ जुलै रोजी रात्री ९.४५ वाजेच्या सुमारास हॉस्पिटलच्या समोर दुचाकी क्रमांक एमएच १९/ एएस ७७४६ लावली होती. दरम्यान त्यानंतर अज्ञात चोरट्यांना दुचाकी चोरून नेली होती. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात सचिन पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित आरोपी आकाश वैजनाथ तायडे (वय-२३) रा. पहूर जामनेर ह.मु. शिरसोली ता.जि.जळगाव याला अटक केली असून त्याच्या ताब्यातील दुचाकी हस्तगत केली आहे. पुढील कारवाईसाठी संशयित आरोपी रामानंद नगर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल फेगडे करीत आहे.