जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पिंप्राळा येथील माहेर आलेल्या विवाहितेला दुचाक घेण्यासाठी ५० हजार रूपये माहेर येथून आणण्याची मागणी करत मारहाण करून छळ केल्याचा प्रकार सोमवारी २८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता समोर आला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील पिंप्राळा येथील माहेर असलेल्या रूकसान रफीद काकर (वय-३०) यांचा विवाह नंदूरबार शहरातील रफीद रशीद काकर यांच्याशी ३० जून २०२१ मध्ये रितीरिवाजानुसार झालेला आहे. लग्नाचे काही दिवसानंतर पती रफीद काकर याने विवाहितेला दुचाकी घेण्यासाठी माहेरहून ५० हजार रूपयांची मागणी केली. विवाहितेने पैसे आणले नाही म्हणून तिला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच सासूसह इतरांनी देखील पैशांसाठी तगादा लावला. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. सोमवारी २८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता विवाहितेने रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव धेवून तक्रार दिली. त्यानुसार पती रफिद रशीद काकर, सासू हसीना रशीद काकर, परवीन रशीद काकर आणि सकीला इसाक काकर सर्व रा. नंदूरबार यांच्याविरोधात रामांनदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक कालसिंग बारेला करीत आहे.