जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील टोलनाक्याजवळील रेल्वे उड्डाणपुलाजवळ समोरा समोर झालेल्या दोन दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी सोमवारी २७ फेब्रुवारी रोजी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नशिराबाद पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, ज्ञानेश्वर सुरेश कोल्हे (वय-२४) रा. शारदा नगर, भुसावळ हा तरूण २३ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता त्याचा मित्र मोहित किशोर पाटील यांच्या सोबत दुचाकी (एमएच १९ डीसी ३८८९) ने भुसावळ शहरात येत असतांना एक अज्ञात दुचाकीस्वार हा त्याच्या ताब्यातील दुचाकी (एमएच १९ बीएफ १०५२) ने विरूध्द दिशेने येत होता. यामुळे दोन्ही दुचाकींची समोरासमोर आल्याने धडक दिली. या अपघातात अनोळखी दुचाकीधारक जागीच ठार झाला. तर ज्ञानेश्वर कोल्हे आणि मोहित पाटील हे दोघे जखमी झाली. या अपघात प्रकारणी सोमवारी २७ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ राजेंद्र ठाकरे करीत आहे.