जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शिरसोली गावाजवळ समोरासमोर दोन दुचाकीच्या धडकेत एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुधवार ७ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता अज्ञात दुचाकीधारकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, शिष खान शरीफ खान (वय-१९) रा. गणेशपुरी, मेहरूण, जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास शिष खान हा त्याचा मित्र साकीब समशेर खान याच्यासोबत शिरसोली येथे दुचाकी (एमएच ३९ के ९१११) ने जात असतांना शिरसोली गावाच्या जवळून जात असतांना समोरून येणारी दुचाकी (एमएच १० सीएल ३४६८) यावरील दुचाकीस्वारात जोरदार धडक दिली. या धडकेत साकीब समशेर खान गंभीर जखमी झाला. त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचरार्थ दाखल करण्यात आले आहे. या घटनेबाबत शिष खान शरीफ खान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात दुचाकीधारकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नितीन पाटील करीत आहे.