जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील कानळदा रोडवरील साईबाबा मंदिराजवळ पायी जाणाऱ्या वृद्ध महिलेला मागून येणाऱ्या दुचाकीने धडक दिल्याने दुखापत केल्याची घटना घडली आहे. या संदर्भात शनिवारी १३ मे रोजी रात्री ११ वाजता शहर पोलीस ठाण्यात दुचाकीस्वार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यशोदाबाई सुखदेव साकला (वय-७०) रा.कानडदा रोड, शिवाजीनगर साईबाबा मंदिर, जळगाव या वृध्द महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. १२ मे रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास यशोदाबाई या दवाखान्यात जाण्यासाठी पायी जात असताना मागून येणारी दुचाकी (एमएच १९ सीई ८५२४) ने जोरदार धडक दिली. या धडकेत यशोदाबाई यांच्या पायाला व कमरेला मुका मार बसलेला आहे. दरम्यान दुचाकीस्वार गणेश महाजन यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली. वृध्द महिलेच्या फिर्यादीवरून शनिवारी १३ मे रोजी रात्री ११ वाजता शहर पोलीस ठाण्यात दुचाकीस्वार गणेश महाजन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस नाईक स्वप्नाली सोनवणे करीत आहे.