दुचाकींच्या समोरासमोर धडकेत दोन वृध्द गंभीर जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव ते धरणगाव रोडवर असलेल्या कल्याणे फाट्या जवळील जिनिंगसमोर दोन दुचाकीच्या झालेल्या धडकेत दोन वृध्द गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या संदर्भात धरणगाव पोलीस ठाण्यात दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, गजानन धनसिंग पाटील (वय-६१) रा.सतखेडा ता. धरणगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ८ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता गजानन पाटील हे त्यांचे सहकारी दिलीप प्रल्हाद पाटील (वय-६२) यांच्यासोबत दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीजे २७०१) ने धरणगाहून सतखेडा येथे जात असताना कल्याणे फाटा जवळील श्री जी जिनिंग समोर येणारी दुचाकी (एमएच १९ डीटी ८८६०) वरील चालक वैभव गौतम गवळी यांनी जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील गजानन धनसिंग पाटील आणि दिलीप प्रल्हाद पाटील हे दोघे गंभीर जखमी झाले. दोघांच्या पायाला गंभीर दुखापत झाली.  शिवाय त्यांच्या दुचाकीचे ही मोठे नुकसान झाले आहे. उपचार घेतल्यानंतर अखेर बुधवारी १२ एप्रिल रोजी रात्री १० वाजता गजानन धनसिंग पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुचाकीस्वार वैभव गौतम गवळी रा. चोपडा यांच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक चंदुलाल सोनवणे करीत आहे.

Protected Content