भुसावळ प्रतिनिधी । जामनेर रोडवरील साई स्वीट या दुकानातून चोरी करणार्या दोघांना आज बाजारपेठ पोलीसांच्या पथकाने अटक केली आहे.
याबाबत वृत्त असे की, अलीकडेच शहरातील साई स्वीट या दुकानात चोरी झाली होती. या अनुषंगाने भुसावळ बाजार पेठ पो.स्टे. गुरन ००८९/२०२०भादवी कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे दिनांक १३/०३/२०२० रोजी २१.५१वा.गुन्हा दाखल झालेला आहे. यातील फिर्यादी- मनोहरलाल संतुमल वत्यानी ( रा.सिंधी कॉलनी) यांचे भुसावळ शहरात जामनेर रोड वरील हसन अली प्लॉट येथील साई स्वीट नावचे दुकान असुन दि.०९ मार्चच्या रात्री कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर चे कुलुप तोडुन दुकानात प्रवेश करुन ६००० रुपये रोख व ४५०० रुपये किंमतीचे ५० सिगारेट पाकिट चोरीस गेल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आज पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळाल्या गुप्त बातमीदारा कडुन माहीती मिळाली की दोन इसम हे भुसावळ शहरात खडका चौफुली भागात संशयास्पद फिरत आहे. त्या वरून त्या दोघांना ताब्यात घेवुन पो.स्टे. ला आणले असता ते किसन पन्नालाल धोबी (वय २२ रा.महात्मा फुले नगर भुसावळ) व योगेश दिनकर कोळी (वय १८ रा.भारत नगर भुसावळ) असल्याचे कळले. त्यांना अधिक विचार पुस केली असता त्या नी वरील गुन्ह्यात चोरी केल्या चे सांगितले वरुन त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, याच आरोपींनी कालच शहरात झालेल्या हुंडाई शोरुम मधील चोरी केल्याचेही कबूल केले आहे.
संबंधीत कार्यवाही ही पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अप्पर अधीक्षक श्रीमती भाग्यश्री नवटके तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड व पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो. निरीक्षक संदीप परदेशी ,अनिल मोरे, सहा. फौजदार तस्लिम पठाण, पो.हे.कॉ. सुनिल जोशी, शंकर पाटील,पो.ना.रविद्र बिर्हाडेे, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, महेश चौधरी, पो.कॉ.विकास सातदिवे, श्रीकृष्णा देशमुख, दिनेश कापडणे, ईश्वर भालेराव व प्रशांत परदेशी यांच्या पथकाने केली असून पुढील तपास पो.हे.कॉ. मिलिंद कंक करीत आहेत.