यावल प्रतिनिधी । लवकरच रमजान ईद निमित्त खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता, प्रशासनाने कापड तसेच अन्य वस्तूंच्या दुकानांना उघडण्याची परवानगी देऊ ने अशा मागणीचे निवेदन येथे एमआयएमतर्फे देण्यात आलेले आहे.
कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे देशात सर्वत्र लॉक डाऊन करण्यात आले असून या आजाराचे प्रादुर्भाव टाळण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर शासकीय यंत्रणा प्रयत्न करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर एमआयएमच्या शिष्टमंडळाने तहसीलदार यांची भेट घेऊन यंदा रमजान ईद च्या निमित्ताने कापड खरेदीसाठी होणारी गर्दी होऊ नये म्हणून अशा दुकानांना उघडण्याची परवानगी देऊ नये असे लेखी निवेदन दिले आहे. यासंदर्भात यावल चे तहसीलदार जितेंद्र कुवर यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की यावेळी संपूर्ण देशात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने युद्धपातळीवर उपाययोजना केली आहे. या अनुषंगाने सोशल डिस्टन्स चे काटेकोर पालन व्हावे या अनुषंगाने यंदा रमजान ईदच्या निमित्ताने खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधवां कडून गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमिवर, यावल शहरातील व तालुक्यातील इमायम पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने कोरोना या विषाणूंच्या प्रकोप थांबण्यासाठी यंदाची रमजान ईद साध्या पाण्यात साजरी करणार आहेत. याकरिता प्रशासनाला सहकार्य तालुक्यातील व शहरातील रमजान ईद उघडण्यात येणारी कापड व शूज दुकाने बंद ठेवावी अशी विनंती चे निवेदन देण्यात आले असून या निवेदनावर आबिद खान युनूस खान, वसीम खान तय्यब खान, एजाज खान सलीम खान, असलम खान नसीर खान, शेख मुशीर शेख मुनीर इरफान खान रशीद खान आदींच्या स्वाक्षर्या आहेत.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००