दीप सिचूसह चौघांची माहिती दिल्यास प्रत्येकी एका लाखाचे बक्षीस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । दीप सिंधूसह चार जणांची माहिती देणाऱ्याला प्रत्येकी एक लाखाचं रोख बक्षिस तर उर्वरित तीन जणांची माहिती देणाऱ्यास प्रत्येकी ५०,००० रुपयांचं बक्षिस मिळणार आहे.

प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडदरम्यान लाल किल्ल्यावर धार्मिक झेंडा फडकवणारा आणि प्रक्षोभक भाषण करणारा पंजाबी अभिनेता दीप सिंधू याच्यासह इतर सहा जण अद्याप फरार आहेत. या सर्वांच्या अटकेसाठी दिल्ली पोलिसांनी बक्षिस जाहीर केले आहेत.

दीप सिंधूसह जुगराज सिंग, गुरजोत सिंग आणि गुरजंत सिंग यांच्या अटकेसाठी त्यांची माहिती देणाऱ्याला प्रत्येकी एक लाख रुपयाचं बक्षिस देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच या हिंसाचाराला जबाबदार असलेल्या जाजबीर सिंग, बूटा सिंग, सुखदेव सिंग आणि इकबाल सिंघ यांच्या अटकेसाठी प्रत्येकी ५०,००० रुपये रोख रक्कमेची घोषणा करण्यात आली आहे.

तीन कृषी कायद्यांविरोधात २६ जानेवारी रोजी दिल्लीत झालेल्या हिंसाचारप्रकरणी दाखल जनहित याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. प्रजासत्ताक दिनी काढलेल्या ट्रॅक्टर परेडदरम्यान आंदोलकांनी लाल किल्ल्यावर चढून धार्मिक झेंडा फडकावला होता. यावरुन सुप्रीम कोर्टात २७ जानेवारी दोन याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. यावर आज सुनावणी होणार आहे.

Protected Content