भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील दीपनगर येथील वीज निर्मिती केंद्रातील माजी सैनिक तथा सुरक्षारक्षक डी.डी.सोपे यांनी करोना महामारी काळात चांगली कामगिरी केल्या बद्दल वंचित बहूजन कंत्राटदार संघटनेतर्फ त्यांचा करोना योध्दा म्हणून सम्मानित करण्यात आला.
फेकरी प्रवेशद्वार येथे आज सकाळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मुबारक खान पठाण,सुरक्षा अधिकारी सी.पी.कदम,उपसुरक्षा अधिकारी रवी व्यास यांच्या उपस्थित सोपे यांना शाखाध्यक्ष नारायण झटके यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून सम्मानित करण्यात आले. सोपे हे माजी सैनिक असून सध्या दीपनगर येथे सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत आहेत. याप्रसंगी संघटनेचे प्रदेश सचिव प्रकाश सरदार, उस्मान खान पठाण, सुरेंद्र ठाकूर,संतोष तेलंग, प्रकाश तायडे, संजय रावलकर आदी उपस्थिती होते.