नवी दिल्ली वृत्तसंस्था । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार आज रात्री नऊ वाजता नऊ मिनिटांपर्यंत देशभरातील जनतेने घरातील लाईट बंद करून दिव्यांचे प्रज्वलन करून कोरोना विरूध्दच्या लढाईत एकतेची वज्रमूठ दाखवून दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला ५ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता नऊ मिनिटांपर्यंत घरातील दिवे बंद करून दिवे लावण्याचे आवाहन केले होते. दिव्यांऐवजी मोबाईलचा फ्लॅश लाईट अथवा टॉर्च वापरण्याचेही त्यांनी सुचविले होते. पंतप्रधानांच्या आवाहनाला मोठ्या प्रमाणात राजकीय विरोध करण्यात आला. तथापि, जनतेने याला उदंड प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. रविवारी रात्री नऊ वाजता देशभरातील कोट्यवधी घरांमध्ये वीज दिवे बंद करून दिवे, मेणबत्त्या अथवा मोबाईलचे फ्लॅशलाईट लावण्यात आले. या माध्यमातून कोरोना विरूध्दच्या लढाईची वज्रमूठ दाखविण्यात आली. तर काही ठिकाणी पंतप्रधानांच्या आवाहनाचे साफ उल्लंघन करण्यात आल्याचेही दिसून आले.
जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००