दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी जि.प.समोर अर्धनग्न आंदोलन (व्हिडिओ)

जळगाव प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यात ग्रामपंचायत स्तरावर दिव्यांग कल्याणकारी योजना न राबविण्याच्या निषेधार्थ आज सोमवारी २७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदेसमोर अर्धनग्न निषेध आंदोलन करण्यात आले. दिव्यांग बांधवांच्या विविध मांगण्यांचे निवेदन आमदार सदाभाऊ खोत यांना देण्यात आले.

 

मुक्ताईनगर तालुक्यातील डॉ. विवेक सोनवणे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाच्या वतीने दरवर्षी दिव्यांग बांधवांना जवळपास पंधराशे कोटीच्यावर खर्च केला जातो. परंतु प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या निगरगट्टपणामुळे दिव्यांग बांधवांचा याचा लाभ होत नाही. त्यामुळे दिव्यांग बांधवांना शासनाने हातभार लावण्यासाठी ज्या लाभाच्या योजना अस्तित्वात आणले आहेत, त्याचा फायदा दिव्यांग बांधवांना होत नाही. तोच प्रकार मुक्ताईनगर तालुक्यात निदर्शनास आला आहे. शासनाने शासन मान्य निर्णय दिव्यांग बांधवांसाठी अस्तित्वात आणला आहे, ते फक्त अधिकारांच्या टेबलावर धूळखात पडून आहे व त्याचा फायदा अधिक बांधवांना होत नाही. ज्यावेळेस एखादा दिव्यांग बांधव संबंधित लाभाची मागणी करण्यासाठी स्थानिक पातळीवर अधिकाऱ्यांकडे जातो, त्यावेळेस तो अधिकारी त्या लाभार्थ्याला आधी तो शासन निर्णय आणून दाखवा मग लाभ देण्याचे बघू असे निर्लज्जपणे सांगितले जाते.  याबाबत स्थानिक पातळीवर तालुका गटविकास अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार देखील केली आहे. त्यामुळे याच्या निषेधार्थ डॉ. विवेक सोनवणे यांच्या नेतृत्वात दिव्यांग बांधवांनी आज सोमवार २७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर अर्धनग्न निषेध आंदोलन करण्यात आले.  या आंदोलनात डॉ. विवेक सोनवणे, महेश महाजन, रजनीकांत बारी, कैलास महाजन, रेमश कोठारी, विजय बारी, प्रदीप परदेशी आदींनी सहभाग नोंदविला आहे.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/395631462166183

 

Protected Content