दिव्यांगांसाठीच्या योजनांची योग्य अंमलबजावणी करा

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यासह जळगाव जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना शासनांच्या विविध योजनांचा लाभ योग्य प्रकारे मिळत नसल्याची तक्रार निवेदनाद्वारे भाजपाच्या दिव्यांग आघाडीचे माजी अध्यक्ष अरूण पाटील यांनी ग्रामविकास मंत्री ना. गिरीष महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 

या निवेदनात आशय असा की, महाराष्ट्र शासनाने दिव्यांग बांधवाना सोयी सवलती मिळणेसाठी पंचायत राज सस्था कडून ५%निधी उपलब्ध करून तो दिव्यांग बाधवासाठी खर्च करावा. परंतु, तो  शासनाकडुन तो खर्च करण्यात येत नाही. या आदेशात दिव्यांग साठीच्या सामुहिक योजना /दिव्यांग साठी च्या वैयक्तिक योजनाचा भरपूर समावेश आहे. पण याबाबतीत तालुका पातळीवर कुठल्याही शासकीय योजनेची अंमलबजावणी होताना दिसत नाही.  ग्रामीण भागातील दिव्यांग बांधवानासाठी दिल्या जाणाऱ्या ५%निधीबाबत अनेकांना माहिती नाही.    जिल्हा स्तरावर/तालुका स्तरावर/गावपातळीवर याबाबतीत कुठल्याही प्रकारे जनजागृती केली जात नाही.  माहिती अभावी दिव्यांग बांधवाना योजना पासून वंचित राहावे लागत आहे.  हा निधी खर्च करण्यात येत नसल्याने तो परत पाठवला जातो. तसेच काही ठिकाणी दिव्यांग बांधवाना हा निधी वाटप केला अस खोटे नाटे व्हावचर  दाखवले जात आहे.

दिव्यांग मंत्रालय नुकतेच आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने भारतातील सर्वात पहिले महाराष्ट्रात प्रथमच स्वतंत्र पणे दिव्यांग मंत्रालयाची स्थापना केली याबद्दल महाराष्ट्र राज्यातील सर्व दिव्यांग बांधवांच्या वतीने आभार मानले.

दिव्यांग मंत्रालय मध्ये दिव्यांग विकास महामंडळाना आतापर्यंत कुठल्याही निधी नसल्याने दिव्यांग बांधवाची उदयोग व्यावसायासाठी कर्ज प्रकरणे कार्यालयांमध्ये धूळ खात पडलेली आहे. ती कर्ज प्रकरणे त्वरित मंजूर करणे साठी निधी उपलब्ध करुन घयावा आणि दिव्यांग ५%निधीची अमलबजावणी करणे साठी शासनस्तरावर प्रयत्न करुन मिळावे ही नम्र विनंती

 

Protected Content