भुसावळ प्रतिनिधी । मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील नाशिक, मनमाड, जळगाव,धुळे,मलकापूर, अकोला,अमरावती,खंडवा, बुरहानपूर येथील आरक्षण कार्यालयात दिव्यांग व्यक्तींना सवलत ओळखपत्र दिले जाणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
भुसावळ रेल्वे वाणिज्य विभागातर्फे प्रसिध्दीस देण्यात आलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, सध्या दिव्यांगांना त्यांच्या जवळच्या आरक्षण कार्यालयात ओळखपत्र बनविण्यासाठी अर्ज सादर करण्याची सुविधा देण्यात आली आहे. परंतु ओळखपत्र मिळविण्यासाठी त्यांना भुसावळ विभागीय कार्यालयात यावे लागत होते. यामुळे सध्याच्या परिस्थितीचा विचार करता ओळखपत्र देण्याची सुविधा रेल्वे प्रशासनाने जवळच्या आरक्षण कार्यालयात केली आहे. त्यांना नाशिक, मनमाड,जळगाव, धुळे, मलकापूर, अकोला, अमरावती, खंडवा, बुरहानपूर या स्थानकांच्या आरक्षण कार्यालयातुन कार्ड दिले जातील. विभागीय कार्यालय द्वारा फोनवर कळविल्यानंतर सबंधित अपंग व्यक्ती त्यांच्या मूळ कागदपत्रांसह त्या स्टेशनच्या आरक्षण कार्यालयात जाऊन त्यांचे कार्ड घेऊ शकणार असल्याचे यात म्हटले आहे.