दिव्यांगांच्या मागण्यांसाठी प्रहारचे गटविकास अधिकार्‍यांना निवेदन

पारोळा प्रतिनिधी । दिव्यांग बंधू-भगिनी यांना जिल्हा परीषद व पंचायत समिती यांच्या स़्व:निधीतून घरकुल योजनेचा व घरटपट्टी, पाणीपट्टी यांच्यात सुट मिळावी म्हणून प्रहार संघटनेमार्फत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

महाराष्ट् शासनाच्या ग्रामविकास विभाग यांच्या मार्फत २५ जून २०१८ रोजीच्या शासन आदेशानुसार पंचायत राज संस्थांनी त्यांच्या स़्व: उत्पन्नातून पाच टक्के निधीतून तसेच २४ नोव्हेबर २०१५ च्या ग्रामविकास विभाग यांच्या शासन निर्णयानुसार जिल्हा परीषद, पंचायत समिती यांच्या स़्व उत्पन्नाच्या तिन टक्के निधीतून अपंग बंधू-भगिनीसाठी खर्च करावा असे आदेश असतांना अधिकारी हे डोळेझाक करतांत असे दिव्यांग बंधू-भगिनी यांनी प्रकार संघटनेच्या समाजसेवक यांच्याकडे व्यथा व्यक्त केल्या.

त्यानुसार पारोळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना प्रहार संघटनेचे तालुका प्रमुख महेश मोरे, तालुका अध्यक्ष जितेंद्र पाटील, ज्ञानेश्‍वर पाटील, पद्मसिंग गिरासे, हेमंत महाजन व इतर कार्यकर्ते यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. यात म्हटले आहे की, दिव्यांग बंधू भगिनी यांना शासन आदेश नुसार घरकुल योजना तसेच घरपट्टी, पाणीपट्टी यांत सुट देण्याकामी आपण वैयक्तीक लक्ष दयावे तसेच तसे आदेश तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीना देण्यात यावे जेणे करुन दिव्यांगाना सुध्दा साधारण व्यक्तीप्रमाणेच आपण सुध्दा वास्तव करत असल्याची जाणीव होईल. आपण दिव्यांग आहोत ही निराशाची भावना त्यांच्या दिसणार नाही असे सांगितले. गटविकास अधिकारी यांनी या प्रकरणी कार्यवाहीचे निर्देश दिले.

Protected Content