मुंबई : वृत्तसंस्था । राज्यातील कोरोना महामारीचा प्रादुर्भाव पाहून ठाकरे सरकारनं दिवाळीसाठी नियमावली जारी केली आहे. राज्यात परिस्थिती सध्या नियंत्रणात असली तरी दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात असल्यामुळे खबरदारी घेत सरकारकडून नियमाली जारी करण्यात आली आहे.
कोरोनाच्या परिस्थितीत आतापर्यंत इतर सण साध्या पद्धतीनं साजरे केले तसेच दिवाळीचा सणही साध्या पद्धतीनं साजरा करावा असं आवाहनही सरकारकडून करण्यात आलं आहे.
राज्य सरकारकडून पुढील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. वाढता प्रादुर्भाव पाहाता गेल्या सात-आठ महिन्यात आलेले सर्व धर्मीय सण-उत्सव अत्यंत साध्या पद्धतीनं व लोकांनी एकत्र न येता साजरे केले आहेत. या वर्षीचा दिवाळी उत्सवही पूर्ण खरबरदारी घेऊन अत्यंत साध्या पद्धतीनं साजरा करावा.
राज्यातील धार्मिक स्थळे अद्याप खुली करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे दिवाळी उत्सव घरगुती स्वरुपात मर्यादित राहिल याची दक्षता घेण्यात यावी उत्सव कालावधीत नागरिकांनी विळेष करुन ज्येष्ठ नागरिक तसेच लहान बालके यांनी घराबाहेर पडण्याचे टाळावे. तसेच नागरिकांनी गर्दी करण्याचेही टाळावे.मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे. .
फटाक्यांमुळे वायू आणि ध्वनी प्रदुषणाची पातळी वाढून जनसामान्यांच्या तसेच प्राणीमात्रांच्या आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम दिवाळी उत्सवानंतर बऱ्याच कालावधीपर्यंत दिसून येतात. कोरोनामुळे परिणाम झालेल्या अनेकांना फटाक्यांच्या धुरामुळे वायू प्रदुषणाचा थेट परिणाम होऊन त्रास होण्याची भिती आहे.. लोकांनी चालू वर्षी पटाके फोटण्याचे टाळावे. त्याचा त्रास होऊ शकतो. दिव्यांची आरस मोठ्या प्रमाणावर करुन उत्सव साजरा करावा.
या उत्सवादरम्यान कोणत्याही प्रकराचे सार्वजनिक उपक्रम किंवा कार्यक्रम (उदा. दिवाळी पहाट) आयोजित करण्यात येऊ नयेत. सांस्कृतीक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम किंवा शिबीरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे.कोरोना, मलेरिया आणि डेंग्यूसारखे आजार आणि त्याचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. मात्र, त्याठिकाणीदेखील लोकांनी एकाचवेळी मोठ्या प्रमाणावर एकत्रित येऊ नये. याची दक्षता घेण्यात यावी.
शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण वैदकीय शिक्षण विभाग तसेच संबधित महापालिका, पोलीस आणि स्थानिक प्रसाशन यांनी वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील.