Home Cities दिवंगत शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीनिमित्त चाळीसगावात विविध कार्यक्रम

दिवंगत शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीनिमित्त चाळीसगावात विविध कार्यक्रम

0
69

चाळीसगाव प्रतिनिधी । शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने चाळीसगाव शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

शिवसेनेच्या शहर तालुका व एसटी कामगार सेना या संघटनांनी सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केले. यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तुकाराम मामा कोळी माजी तालुकाप्रमुख गोपाल दायमा तालुकाप्रमुख तथा माजी कृषी उत्तम बाजार समिती सभापती रमेश चव्हाण, तालुका प्रवक्ता दिलीप घोरपडे, तालुका संघटक सुनील गायकवाड, शैलेंद्र सातपुते, रामेश्‍वर चौधरी, सुनील कोडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याची महती उपस्थित वक्त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. तसेच त्यांच्या स्वप्नातली शिवसेना पुन्हा एकदा नव्याने उभी करण्यासाठी जोमाने कामाला लागावे असे आवाहन देखील करण्यात आले.

यावेळी शहरातील असंख्य शिवसैनिक महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, चाळीसगाव एसटी आगाराचे प्रमुख निकम, एस. टी. कामगार सेनेचे तालुकाप्रमुख दिलीप पाटील, शहरप्रमुख रघुनाथ कोळी, विजय शर्मा, हेमंत पाटील अंबर पाटील आदी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound