दिल्ली हिंसाचार : गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्याची हत्या !

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्लीतील हिंसाचारात गुप्तचर विभागातील एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अंकित शर्मा असे मयत अधिकाऱ्याचे नाव आहे. दरम्यान, शर्मां यांच्या कुटुंबाने एका स्थानिक नगरसेवकावर हत्या केल्याचा संशय व्यक्त केला आहे.

 

मध्ये मागील चार दिवसांपासून प्रचंड हिंसाचार भडकला आहे. यात आतापर्यंत २० जणांच मृत्यू झाला आहे. यातच आता दिल्लीतील आयबी (इंटेलिजंस ब्यूरो)मधील अंकित शर्मा या अधिकाऱ्याचा मृतदेह आढळला आहे. दगडफेकीदरम्यान त्यांची हत्या करुन, मृतदेह चांदबागमधील एका नाल्यात फेकून दिला होता. आयबी अधिकारी अंकित शर्मा चांदबागमध्येच राहत होते. ते आपल्या ड्यूटीवरुन घरी परत येत होते, पण यावेळी दंगल पेटल्यानंतर ते माहिती गोळा करण्यासाठी गेले. अंकित यांच्या कुटुंबाने एका स्थानिक नगरसेवकावर हत्या केल्याचा संशय व्यक्त केला आहे. शर्मा यांचा मृतदेह पोलिसांनी चांदबाग पुलाजवळील नाल्यातून बाहेर काढण्यात आला आहे.

Protected Content