नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ‘आप’चा निलंबित नगरसेवक ताहिर हुसैनच्या घरामध्ये आणि शेजारील दुकानामध्ये सल्फ्युरिक अॅसिडचा मोठा साठा सापडला आहे. हे अॅसिड एवढे तीव्र आहे की काही मिनिटांतच ते त्वचेच्या आतील भागापर्यंत जाळू शकते.
दिल्ली हिंसाचारामध्ये नगरसेवक ताहिर हुसैनच्या घरातून अॅसिडही फेकण्यात आल्याचा आरोप शेजाऱ्यांनी केला होता. त्याच्या घराच्या बाजुलाच असलेल्या दुकानामध्ये मोठेमोठे ड्रम सापडले आहेत. यावर गंगाजल लिहिले होते. हे अॅसिड फॅक्टरीमध्ये वापरले जाते. ते लायसन, आधार कार्ड आणि कारण सांगितल्याशिवाय सहजासहजी खरेदी करता येत नाही. ताहिरकडे सापडलेले अॅसिड हे तीन पैकी सर्वात घातकी प्रकारातील आहे. लोकांवर फेकण्यासाठी हे अॅसिड पिशव्यामध्ये भरण्यात आले होते. या पिशव्या भरलेल्या गोण्याही ताहिरच्या घरात सापडल्या आहेत,असेही पोलिसांचे म्हणणे आहे.