दिल्ली (वृत्तसंस्था) राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी दिल्लीत सुरु असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री उशिरा उत्तर-पूर्व दिल्ली परिसरात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
डोवाल आणि अन्य अधिकाऱ्यांनी मौजपूर, जाफराबाद, गोकुलपुरी आणि भजनपुूरा येथे जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला. अजित डोवाल दिल्लीतील परिस्थितीवर बारीक लक्ष ठेऊन आहेत. दिल्लीतील हिंसाचारावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार आणि दिल्ली प्रशासनामध्ये बैठकांचे सत्र सुरु आहे. डोवाल यांनी सीलमपूरमध्ये उत्तर-पूर्वचे डीसीपी वेद प्रकाश सुर्या यांच्या कार्यालयात बैठक घेतली. यावेळी दिल्लीचे पोलीस प्रमुख अमूल्य पटनायक त्यांच्यासोबत होते.